जळकोट ,दि.१८ मेघराज किलजे
तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथे क्रिप्टो रिलीफ इंडिया व उस्मानाबाद येथील स्वयं शिक्षण प्रयोग यांच्या संयुक्त विद्यमाने आर्थिकदृष्ट्या दुर्बल तसेच मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबांना किराणा साहित्याच्या २४ किटचे वाटप करण्यात आले.
या किटमध्ये गव्हाचे पीठ, तांदूळ, तूर डाळ, हरभरा डाळ, मूग डाळ, साखर, पोहे, चहापत्ती, मिरची पावडर, हळद पावडर, बिस्किट आदि साहित्याचा समावेश आहे. यापूर्वीही स्वयं शिक्षण प्रयोग या संस्थेकडून फ्रंटलाईन वर्कर त्यामध्ये डॉक्टर, सिस्टर्स अन्य आरोग्य कर्मचारी, पत्रकार बांधव आदींसह गरीब कुटुंबांना मास्क, सॅनिटायझर, मोती साबण आदि साहित्याचे वाटप करण्यात आले होते.
याप्रसंगी विठ्ठल-रुक्मिणी मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष बसवराज कवठे, विठ्ठल कदम , स्वयं शिक्षण प्रयोगच्या तालुका समन्वयक श्रीमती जयश्री कदम, ग्रामपंचायत कर्मचारी नागू स्वामी, प्रवीण कदम, अनिल पासोडे, अखिल पटेल आदींसह ग्रामस्थ, लाभार्थी उपस्थित होते.