उस्मानाबाद , दि .१८
महा.एन.जी.ओ. फेडरेशन महाराष्ट्र राज्य व श्रीमंतराजे प्रतिष्ठाण,
कपिलापुरी यांच्या संयुक्त विद्यमाने हनुमान मंदिर परिसर दुभाजक रस्त्याच्यामध्ये, शेत बांधावर, पडीक क्षेत्र, कपिलापुरी या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.
यामध्ये वड, चिंच, जांभूळ, आंबा, पेरू, सिताफळ या रोपांची लागवड करण्यात आली. तसेच रोपांचे संरक्षण व्हावे म्हणून आवश्यक ठिकाणी वृक्ष संरक्षण जाळी बसविण्यात आली. यामध्ये एकूण ६६ रोपांची लागवड करून संवर्धन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
तसेच संस्थेच्या वतीने अरिहंत ॲक्वा कपिलापुरी यांना दोन रोपे संगोपन करण्यासाठी दिली आहेत.
गतवर्षी लावण्यात आलेल्या रोपांचे संगोपन करून १० वृक्षांचे संवर्धन करण्यात आले. तसेच वृक्षच आपले खरे मित्र आहेत, वृक्ष लागवडीतुन सावली, फळे व पुरेसा ऑक्सिजन मिळेल व पर्यावरण संतुलित राहील त्यामुळे गावातील एका कुटुंबाने एक रोप लावावे असे आवाहन श्रीमंतराजे प्रतिष्ठाणचे अध्यक्ष वृक्षमित्र रणजीत महादेव पाटील यांनी केले.
हा उपक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी ग्रामपंचायत कपिलापुरी, श्रीमंतराजे प्रतिष्ठाण कपिलापुरी, महा एन जी ओ फेडरेशन महाराष्ट्र यांनी सहकार्य केले, या प्रसंगी कपिलापुरीचे विद्यमान सरपंच वैभव आवाने, डॉ. अनिल खाने,संगणक परिचारक नितीन शिंदे, पारस पिंपरकर, विराट आवाने, सूरज बनसोडे, शुभम शिंदे, भरतेश मसलकर, किशोर आवणे, बाहुबली देवळकर, समाधान मसगुडे, प्रमोद जाधव, व प्रतिष्ठाणचे अध्यक्ष रणजीत पाटील उपस्थित होते.