तुळजापूर  दि .  ३ : डॉ. सतीश महामुनी

केंद्र सरकारच्या रेल्वे मंत्रालयाकडून सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद या रेल्वे प्रकल्पासाठी आर्थिक मदत होत नसल्यामुळे सोलापूर उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यातील नागरिकांमध्ये नाराजी आहे. या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी केवळ प्रसिद्धीसाठी रेल्वेमार्गाच्या कामाला महत्त्व देतात अशी बाब निदर्शनास आली आहे.

तुळजाभवानीचे तीर्थक्षेत्र असणाऱ्या तुळजापूर तीर्थक्षेत्राला रेल्वेमार्गाला जोडणारा सोलापूर तुळजापूर उस्मानाबाद रेल्वे मार्ग प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय घोषणेनंतर मंजूर करण्यात आला. मंजुरीनंतर या योजनेला चालना मिळून आज पर्यंत रेल्वे मार्ग सुरू होणे अपेक्षित होते 
. परंतु आजपर्यंत सर्वेक्षणाचे काम देखील पूर्ण झालेले नाही, त्यामुळे हा रेल्वे मार्ग केव्हा पूर्ण होणार , याकडे  नागरिकासह भाविक भक्ताचे लक्ष  लागले आहे.

मराठवाड्याच्या प्रवेशद्वार असणाऱ्या तामलवाडी या तुळजापूर तालुक्यातील गावापासून सुरू होणारा हा मार्ग सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद या नावाने मंजूर करण्यात आला आहे. मात्र मंजुरी पासून या योजनेला गांभीर्याने घेण्यात आलेले नाही.  

 केंद्र सरकार रेल्वे मंत्रालय या योजनेला महत्त्व देत नसून आवश्यक निधी उपलब्ध न झाल्यामुळे ही योजना पूर्ण होऊ शकलेली नाही.

नगर बीड परळी या रेल्वे मार्गासाठी केंद्र सरकारच्या रेल्वे मंत्रालयाने शंभर कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे . या पार्श्वभूमीवर सोलापूर तुळजापूर उस्मानाबाद रेल्वे मार्ग निधी देण्यात यावा अशी मागणी आहे .  केंद्र सरकारच्या रेल्वे मंत्रालयाने उस्मानाबाद जिल्ह्यातील या रेल्वे प्रकल्पाला प्राधान्यक्रम देऊन निधी द्यावा आणि लवकरात लवकर तुळजाभवानी देवीचे तीर्थक्षेत्र रेल्वेच्या नकाशावर रेल्वे गाडी सुरू करून आणावेत अशी भाविक भक्तांतातुन  मागणी होत आहे . 
 
Top