तुळजापूर , दि . २०

तुळजापूर सीटी स्कॅनचा मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला आहे. शहरातील  नवीन बसस्थानक परिसरात  सीटी स्कॅन सुविधा झाल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. 

 प्रारंभी  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.  धनंजय पाटील यांच्या हस्ते प्रतिमेचे  पूजन करून ,  फित कापून तुळजापूर सीटी स्कॅनचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला. 

याप्रसंगी नगराध्यक्ष  सचिन रोचकरी, श्री  तुळजाभवानी मातेचे महंत वाकोजी बाबा, वैद्यकीय अधिक्षीका डाॅ. चंचला बोडके,  मेडिकल  असोशिएशनचे  अध्यक्ष डॉ. आबासाहेब कदम , निमाचे  अध्यक्ष डॉ. विकास क्षिरसागर, डॉ. नरसिंग मलबा, डॉ. सुरेंद्र पेशवे, डॉ. भारत माने ,डॉ. सतीश पवार, पुजारी मंडळाचे अध्यक्ष  सज्जनराव साळुंके, सचिव किरण क्षिरसागर, जेष्ठ  नेते अशोक मगर, उस्मानाबाद कृषि उत्पन बाजार समितीचे सभापती  दत्तात्रय देशमुख, विद्यापीठ अधिसभा सदस्य 
संभाजी भोसले, युवासेना तालुका प्रमुख प्रतिक रोचकरी यांचा सह शहरातील नगरसेवक, पंचक्रोशीतील डॉक्टर्स, वकिल, व्यावसायिक, प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
 
Top