तुळजापूर , दि . २०
तुळजापूर येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्यासाठी उस्मानाबाद जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन सदर पूर्णाकृती पुतळा तातडीने उभा करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
तुळजापूर या तीर्थक्षेत्र असणाऱ्या शहरांमध्ये बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा शहराचे सौंदर्य वाढवणार आहे, अशा आशयाचे निवेदन सागर कदम आणि त्यांचे सहकारी यांनी जिल्हाधिकारी यांना देऊन यासंदर्भात तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.
निवेदनावर सागर कदम, लक्ष्मण कदम, सोमनाथ सोनवणे, किरण कदम, खंडू कदम, अनमोल शिंदे, अनिकेत सोनवणे, कमलेश कदम,कूणाल रोंगे, राहूल सोनवणे, योगेश सोनवणे, चेतन कदम आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत