जागतिक न्याय दिनानिमित्त लोहारा येथे वकीलांचा गोदावरी अर्बन सास्तूर शाखेच्या वतीने गौरव करण्यात आला.
लोहारा , दि . २०
न्याय प्रक्रियेच्या माध्यमातून सर्व सामान्यांना न्याय मिळवून देणाऱ्या न्यायाधीश आणि वकिलांचा गोदावरी अर्बन मल्टी स्टेट क्रे- को ऑप सोसायटी, लि,नांदेड शाखा - सास्तूर यांच्या वतीने जागतिक न्यायदिनाचे औचित्य साधून न्यायव्यवस्थेच्या न्यायाधीश व वकिलांचा लोहारा येथे गौरव करण्यात आला.
न्याय व्यवस्थेमुळेच देशात आणि जगात आज शांतता आणि समता अबाधित आहे. त्यामुळे न्यायव्यवस्था ही सर्व सामान्यासाठीच आहे, ही भावना यानिमित्ताने दृढ व्हावी याअनुषंगाने गोदावरी अर्बनच्या अध्यक्षा राजश्री पाटील यांच्या संकल्पनेतून व व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वकील संघाचे अध्यक्ष ॲड. के. डी. मोरे, उपाध्यक्ष मा. ॲड.एस. आर. भुसणे, सचिव ॲड. एस.जी. पणुरे, सहसचिव मा. ॲड.एस.आर.आडसुळे, कोषाध्यक्ष ॲड.ए. ए. कुलकर्णी यांच्यासह वकील संघाचे सर्व सदस्य व कर्मचारी वृंद यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
यावेळी गोदावरी अर्बनचे स्थानिक संचालक रब्बानी नळेगावे, संतोष मुर्टे, शाखा प्रभारी शंकर गोठे यांच्यासह कर्मचारी वृंद उपस्थित होते.
जगभरात दि . १७ जुलै हा जागतिक न्याय दिवस साजरा केला जातो.१९९८ च्या रोम ठरवाद्वारे आंतरराष्ट्रीय न्यायची संकल्पना मांडण्यात आली. पृथ्वीतलावरील कोणत्याही भागात मानवावर होणाऱ्या सामाजिक अन्यायाविरुद्ध संवेदनशील व्हावे यासाठी कायद्याचे राज्य आणि जगभरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी जागतिक पातळीवर कायमस्वरूपी पहिलीच स्वतंत्र न्याय यंत्रणा म्हणून जागतिक न्यायालय स्थापन करण्यात आले.
याप्रसंगी गोदावरी अर्बनच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रम आणि सेवांची माहिती देण्यात आली.
न्यायाधीश व वकील हे संविधानिक तत्वाचे पालन करून सामान्य नागरिकांना न्याय मिळवून असतात.त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा या मागचा उद्देश आहे.