उस्मानाबाद ,दि . १९ :
आनंदनगर पोलीस ठाणे : आशिष ज्ञानोबा ढाकणे, रा. उस्मानाबाद याने श्रीमती मनिशा रामदत्त गिरी यांना ईमारतीच्या चौथ्या मजल्याच्या छतावरुन खाली टाकून त्यांच्या खुनाचा प्रयत्न केल्याने आनंदनगर पो.ठा. येथे गु.र.क्र. 155 / 2019 नोंदवण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपअधीक्षक श्री. मोतीचंद राठोड यांनी करुन उस्मानाबाद सत्र न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते.
या सत्र खटला क्र. 754 / 2021 चा निकाल आज दि. 19 जुलै रोजी जाहिर होउन आरोपी- आशिष ढाकणे यास 7 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व 25,000 ₹ दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे.