उस्मानाबाद , दि . ४


पोलीस ठाणे,नळदुर्ग : राजु अण्णाप्पा ईटकर, रा. देशमुख वस्ती, अणदुर यांनी ट्ऱक क्रमांक एम एच 13 ए एक्स 4132 ही देशमुख वस्तीजवळील  महामार्गाच्या  सर्व्हीस रोडवर लावली होती. दरम्यान दिनांक 03 जुलै रोजी रात्री 02.00 वा स्वीफट डीझायर कार क्रमांक एम एच 13 सी यु 5121 मधुन आलेल्या अज्ञात तीन चोरटयांनी ट्रकच्या  इंधन टाकीतील 300 लीटर डीझेल चोरुन नेले. अशा मजकुराच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

पोलीस ठाणे, उमरगा : कवठा येथील निळकंठ सोनवणे हे दिनांक 01 जुलै रोजी दुकानाचे दार अर्धवट उघडे ठेवुन आत झोपले होते. मध्यरात्री 00.30 वा. सुमारास अज्ञाताने दुकानात प्रवेश करुन निळकंठ यांच्या उशाखालील एक लाख रुपये रककम चोरुन नेली.अशा मजकुराच्या प्रथम खबरेवरुन दिनांक 03 जुलै रोजी  भा.दं.सं. कलम-  380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
Top