उस्मानाबाद दि. ४
पोलीस ठाणे,अंबी : दिनांक 03 जुलै रोजी 15.00 वा अंबी पोलीसांनी शेळगाव येथे छापा टाकला असाता माणीक नगर येथील चिंचेच्या झाडाखाली 1) ज्ञानोबा शेडकर, 2) बापु शेडकर, 3) नारायण गागंर्डे, 4) भारत शेडकर, 5) शंकर गागंर्डे, 6) प्रकाश शेडकर, 7) बाबु शेडकर, 8) गणेश गुनवरे, 9) दादा गागंर्डे, 10) रमेश गागंर्डे सर्व रा. शेळगाव ता. परंडा व 11) बाळु सावंत रा. सावंतवस्ती चिंचपुर (बु) तिरट जुगार चालवण्याचे साहित्यासह मिळुन आले. तसेच त्यांच्या या कृत्यामुळे कोनोना संसर्ग पसरण्याचा दाट संभव असल्याने पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द भादसं 269 व म.जु.का. अंतर्गत व गुन्हा नोंदवला आहे.
पोलीस ठाणे,तुळजापूर : दिनांक 03 जुलै रोजी 20.10 वा तुळजापूर पोलीसांनी तुळजापूर बस स्थानक पाठीमागे सुलभ सौचालय जवळ छापा मारता असात जावेद करीमोशीन (हुसेन) शेख, रा.वासुदेव गल्ली ,तुळजापूर हे मिलन नाईट मटका जुगार खेळत व खेळवित असतांना साहित्यासह मिळुन आले. नमूद व्यक्ती विरुध्द म.जु.का. अंतर्गत व गुन्हा नोंदवला आहे.