उमरगा , दि. १९ :

राज्यातील होमगार्ड समस्या घेऊन समाजसेवक रामलिंग पुराणे यांचा पुणे ते मुंबई पायी मोर्चा व मुख्यमंत्री निवासावर ठिय्या आंदोलन ६ ऑगस्ट पासून पुणे ते मुंबई (मुख्यमंत्री निवास) पायी मोर्चा काडून ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे


महाराष्ट्र राज्यातील होमगार्ड समस्या/खालील मागण्या घेऊन २१ जानेवारी २०२० पासून बसव प्रतिष्ठाण अध्यक्ष तथा समाजसेवक रामलिंग पुराणे यांनी शासनाकडे पाठपुरावा करत आहेत, दि.८ जून रोजी राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व्हीसी बैठक संपन्न झाली. दि.१७ जून रोजी कारवाई साठी पत्र ही पाठवण्यात आले. परंतु अद्याप राज्यातील होमगार्ड समस्या किंवा मागण्यांवर सरकारकडून सोडविण्यात आले नाहीत, त्याबाबत दि.६ ऑगस्ट २०२१ पासून पुणे ते मुंबई (वर्षा बंगला) मुख्यमंत्री निवास पायी मोर्चा व ठिय्या आंदोलना बाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, गृहराज्यमंत्री यांना दि.५ जुलै २०२१ रोजी ई-मेल द्वारे निवेदन देऊन कळविण्यात आले असून दि.०६ ऑगस्ट पासून रामलिंग पुराणे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनास सुरुवात होणार असल्याचे पुराणे यांनी सांगितले.


प्रमुख मागण्या
१) जाचक अटी लावून/विविध कारणांनी अपात्र होमगार्डना त्वरित विनाअट कामावर रुजू करून घ्यावे.
२) कायमस्वरूपी 365 दिवस कामावर घ्यावे.
३) बंदोबस्त मानधन आठवडाभरात द्यावे, 
४)पोलीस खात्यातील 5% आरक्षण वरून 15% आरक्षन करावे.
५) तीन वर्षांनी होणारी पुनरनोंदनी/पुनर्नियुक्ती पध्द्त बंद करावे, 
६) जिल्हा समादेशक/मानसेवी पद पूर्वरत ठेवावे,आंदोलकावरील झालेली कार्यवाही त्वरित मागे घ्यावे 
७) विविध कारणांनी कामावरून काडून टाकण्यात आलेल्या समादेशक/इतर अधिकाऱ्यांना परत नियुक्ती द्यावे.
८) पोलीस प्रशासनास जी आपत्तीजनक विमा रक्कम मंजूर आहे त्यात होमगार्डचा ही समावेश करावा.
९) ३० जुलै २००९ च्या शासन निर्णयात बदल करून २ लक्ष रुपये विमा ऐवजी २०२० च्या चालू महागाई नुसार २० लक्ष रुपये करावे व तसेच परिवाराला लघु उद्योग साठी तात्काळ देण्यात येणारे १० हजार रुपये ऐवजी १ लाख रुपये देण्यात यावे व त्यांच्या पाल्याचा शिक्षण खर्चही वाढवून द्यावे. 
१०) प्रशिक्षण घेऊनही अद्याप त्यांना प्रमाणपत्र देण्यात आले नाहीत, त्यांना पोलीस भरतीत आरक्षण नुसार समाविष्ट करून घ्यावे.
११) उच्चस्तरीय समिती गठीत करावे.
१२) होमगार्ड अधिनियमात बदल करावे.
१३) निष्काम सेवा हे ब्रीद वाक्य काढावे.
१४) आत्महत्या व अपघातात मयत झालेल्या होमगार्डना शासनाकडून तात्काळ मदत जाहीर करावे.
१५) शासनाचे आदेशाचे होमगार्ड विभागातून तात्काळ अंमलबजावणी न करणाऱ्या वेतनधारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करावे.
१६) पोलीस भरतीत होमगार्डना वयोमर्यादा ०५ वर्षेपर्यंत वाढवून देण्यात यावे.
१७) वय वर्षे ५० वरील होमगार्डना कामे देण्यास सुरुवात करावी, कोरोना काळातील त्यांच्या थांबवलेल्या कामाचा नुकसानभरपाई द्यावे.
वरील मागण्या घेऊन दि.६ ऑगस्ट २०२१ पासून सरकारच्या निषेधार्थ, "होमगार्डच्या सन्मानार्थ" आम्ही आंदोलन छेडत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.


रामलिंग पुराणे, समाजसेवक तथा अध्यक्ष बसव प्रतिष्ठाण

राज्यातील होमगार्ड समस्या घेऊन गेल्या दोन वर्षांपासून शासनाकडे पाठपुरावा करत आहोत, या संदर्भात मा.राज्यपाल यांचेही भेट घेण्यात आले होते, गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या सोबत दि. ८ जून रोजी व्हीसी मिटिंगात ही वरील मागण्या संदर्भात चर्चा आणि निर्णय झाला परंतु अद्याप कसलीही कारवाई मात्र झाली नाही,दि.६ ऑगस्ट पासून पुणे ते मुंबई (मुख्यमंत्री निवास) पायी मोर्चा काडून ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे आणि जो पर्यंत शासन निर्णय होणार नाही तोपर्यंत आंदोलन माघे घेण्यात येणार नाही.

 
Top