काटी , दि . १९ : उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटी, व तामलवाडी येथे सोमवार दि. 19 रोजी सकाळी 11:30 व 12:30 वाजता आगामी बकरी ईदनिमित्त तामलवाडी व काटी येथील प्रमुख मार्गावरून तामलवाडी पोलीस ठाण्याच्या वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली उस्मानाबाद येथील दंगल नियंत्रण पथकातील 40 कर्मचाऱ्यांच्या पथकाने लक्षवेधक पथसंचलन केले.
काटी, व तामलवाडीसह परिसरातील मुस्लिम बांधवांनी बकरी ईद हा धार्मिक उत्सव यंदा कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करता घरगुती व साधेपणाने साजरा करावा असे आवाहन तामलवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडित यांनी यावेळी केले.
तसेच तामलवाडी पोलीस ठाण्या अंतर्गत 27 गावातील पोलीस पाटील, तंटामुक्त ग्राम समिती, सर्व प्रमुखांनी पुढाकार घेऊन सर्वानी सामाजिक सौदार्या, गावातील एकोपा, समभाव, सदाचार, आणि बंधु प्रेम परंपरा पुढे ही सुरु ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
या पथसंचलनात पथसंचलन प्रमुख सपोनि सचिन पंडित, एएसआय गोकुळ गिरी, राजेंद्रसिंह ठाकुर, हवालदार ओहोळ, हवालदार भोसले, पोलीस अंमलदार जुबेर काझी, अंमलदार आकाश सुरुनर,पवन नागरगोजे, व दंगल नियंत्रण पथकातील कर्मचारी यांच्यासह तामलवाडी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी सहभागी होते.