उस्मानाबाद ,दि . १९
शहरातील रोटरी क्लब मार्फत कोरोनामुळे पतीचा मृत्यु झालेल्या विधवा महिलांना मान्यवरांचे हस्ते शिलाई मशिनचे वाटप करण्यात आले.
यामध्ये सुरेखा बळीराम गाटे, अनिता कालिदास देवकर, पुजा ओंकार तानवडे, सारिका उमाकांत गवळी, प्रियंका गणेश सुरवसे,अनुराधा राहुल बर्डे, फातेमा चांद शेख या विधवा महिलांना रोटरी तर्फे शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले.
तसेच उस्मानाबाद ते रायगड सायकल प्रवास केलेल्या सायकल स्वारांचाही सत्कार मान्यवरांचे हस्ते सत्कार करुन सन्मानित करण्यात आले. यामध्ये सुरज कदम, प्रदिप खामकर, रो.रणजित रणदिवे, इंद्रजित पाटील, अभिजीत पाटील, अमोल माने, चित्रसेन राजेनिंबाळकर, रवी शितोळे, दिग्विजय घुटे पाटील, संजय चव्हाण, पुरूषोत्तम रूकमे,नितीन तानवडे,रो चंदन भडंगे, गणेश एकंडे, रो.आनंद देशमुख, रो गिरीश अष्टगी,दिपक वळसे या सायकल पटुंचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी प्रमुख पाहूणे धनंजय गायकवाड, डाॅ लक्ष्मीकांत डिग्गीकर, नुतन अध्यक्ष सुनिल गर्जे, सचिव कुणाल गांधी,माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख, माजी सचिव इंद्रजित आखाडे, प्रदिप मुंडे,नंदकुमार पिंपळे,ॲड महेंद्र देशमुख, रविंद्र साळुंके,प्रमोद दंडवते,सुधाकर भोसले, संजय देशमाने,अभिजीत पवार आदी रोटरीचे पदाधिकारी तसेच रोटेरीयन उपस्थित होते.