नळदुर्ग , दि. १९ :
आगामी बकरी ईद सणाच्या व कोविड 19 च्या अनुषंगाने नळदुर्ग पोलीस ठाणाच्या वतीने पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, या अनुषंगाने दंगा काबू नियंत्रण पथक व शहर पोलिसाकडून बकरी ईदच्या निमित्ताने रूट मार्च घेण्यात आला.
शहरातील प्रमुख भागातून पोलिस पथकाने सोमवारी दुपारी रूट मार्च काढला. यावेळी साहय्यक पोलीस निरीक्षक जगदीश राऊत , सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर मोटे , पोलिस उपनिरीक्षक कैलास लहाने , गोपनीय शाखेचे धनाजी वाघमारे व सर्व पोलिस कर्मचारी उपस्थित होते.