वागदरी , दि .१५ :एस.के गायकवाड
तुळजापुर तालुक्यातील वागदरी व परिसरात सलग दोन दिवस पाऊस झाल्याने नळदुर्ग ते अक्कलकोट रोडवर नाईकनगर पाटी जवळ रस्त्याचे काम अर्धवट असल्याने या ठिकाणी पाणी साचुन चिखलाचे दलदल झाल्याने दुपारी आयसर टेम्पो त्या चिखलात आडकला.
त्यामुळे काही काळ या मार्गावर वाहतूकीचा पार खोळंबा झाला. नळदुर्ग ते अक्कलकोट जाणारी महामंडळाची एस.टी.बस अडकून पडल्यने प्रवाशांची मोठी हेळसांड झाली.
नळदुर्ग ते अक्कलकोट या रोडचे काम गेल्या दोन वर्षी पासून सिमेंट रस्ता बनविण्यासाठीचे काम चालू आहे. या मार्गावर तुळजापूर तालुक्यातील वागदरी पाटी ते नळदुर्ग सहा कि.मी.अंतर आहे. त्यापैकी जवळपास चार कि.मी.रस्ता संबंधित गुत्तेदाराने उखडून ठेवला आहे. गेली दोन दिवस सतत पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावल्याने उखडलेल्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल झाल्याने या मार्गावरुन वाहान चालविणे वाहान चालकाना जीव मुठीत धरून तारेवरची कसरत करावी लागत आहे.
बुधवार दि.१४ जुलै रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास या रस्त्यावर नळदुर्ग ते अक्कलकोट जात असलेला आयसर टेम्पो पाटील तांडा पाटी नजीक चिखलात आडकल्याने काही काळ या मार्गावरील वहातुकीस अडचण निर्माण झाली.
अक्कलकोटला जणारी बस मध्येच अडकून पडल्याने बस मधील प्रवाशाची तारांबळ उडाली.
रोड लगतच्या शेतकऱ्यानी हा रस्ता आडविल्याने सध्या रस्त्याचे काम थांबवून गुत्तेदाराने या रस्त्याकडे पाठ फिरवली आहे. हे जरी खरे असले तरी उखडून ठेवलेल्या रस्त्यावर खडीकरण करून तात्पुरती वहातुकीची व्यवस्था संबंधित गुत्तेदाराने करावे अशी मागणी ग्रामस्थातून होत आहे.