तुळजापूर दि .१४ : डॉ. सतीश महामुनी
तुळजापूर तालुक्यातील खडकी येथे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी २ कोटी ५० लाख रुपये किमतीच्या विविध विकास कामांचा शुभारंभ केला. त्यापूर्वी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे खडकी येथे जोरदार स्वागत करण्यात आले.
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी खडकी ते शिवाजीनगर रुपये २.२६ कोटींच्या रस्त्याच्या डांबरीकरणाचे भूमिपूजन, दलित वस्तीवरील ८ लक्ष रुपयांच्या पाणीपुरवठा पाईपलाईनचे भूमिपूजन, ११ लक्ष किंमतीच्या सिमेंट काँक्रीटिकरण रस्त्याचे भूमिपूजन, ३ लक्ष विकासनिधीतून होणारी गावातील पाईपलाईन व ६ लक्ष निधीतून होणाऱ्या रस्ता-गटार या विकासकामांचे भूमिपूजन यात विकास कामांचा समावेश आहे.
याप्रसंगी माजी जि. प.सदस्य वसंत वडगावे, पंचायत समिती सभापती इंगोले , उपसभापती शिवाजी गोरे, प्रमुख पाहुणे भिवा इंगोले, प. स. सदस्य शिवाजी साठे, राजाभाऊ सोनटक्के, बाबा श्रीनामे, अरविंद बागडे, अरविंद पाटील, प. स. सदस्य दत्तात्रय शिंदे, पंचायत समिती सदस्य कळसुरे, यांच्यासह सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य खडकी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी राम जवान यांनी आमदार पाटील यांचे ग्रामस्थांच्या वतीने स्वागत केले.
आमदार पाटील यांनी याप्रसंगी साठवण तलाव दुरुस्तीसाठी देखील लवकरच पाठपुरावा करून निधी निश्चितपणे उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू असे सांगितले, आगामी काळात खडकी गावामध्ये जास्तीत जास्त विकासनिधी देऊन गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही याप्रसंगी देण्यात आली .नागरिकांच्या महत्वाच्या असलेल्या खडकी ते शिवाजीनगर रस्त्याचे काम सुरू झाल्याने ग्रामस्थांनी आमदार राणाजगजितसिह पाटील यांचे आभार मानले.