शेतकऱ्याचा सर्व पातळीवर मदत करा खासदारांची अधिकाऱ्यांना सूचना

तुळजापूर दि १४ डॉ. सतीश महामुनी

खरीप हंगाम  २०२१ पिक कर्ज संदर्भात उस्मानाबाद जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी अत्यंत महत्त्वाची बैठक घेऊन शेतकऱ्यांना  सहकार्य करण्याचे आवाहन केले.  

तुळजापूर येथील शासकीय विश्रामगृहात खासदार ओमराजे निंबाळकर यांनी घेतलेल्या बैठकीत महत्त्वाच्या सूचना केल्या, दत्तक बँकांच्या सर्व शाखा व्यवस्थापकांनी दर्शनी भागावर गावाची यादी लावण्यात यावी. तालुक्यातील पात्र शेतकरी कर्जपुरवठा पासून वंचित राहणार नाहीत ,  याची दक्षता घ्यावी, पीक कर्ज संदर्भात लागणारी कागदपत्रे दर्शनी भागावरती लावण्यात यावीत. याबैठकीस प्रामुख्याने जिल्हा अग्रणी बँकेचे विजयकर, जिल्हा निबंधक   देशमुख आदी उपस्थित होते.


शेतकरी बांधवांना सन्मापूर्वक वागणूक देण्यात यावी ३१  जुलै पर्यंत जुन्या पात्र शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचे पुनर्जीवन करावे, नवीन कर्ज देण्यात यावे, राज्य शासनाच्या पंजाबराव देशमुख कर्ज व्याज सवलतीचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना सहकार्य करावे, वेळेत शेतकऱ्यांना कर्ज वाटप झाल्यास शेतकऱ्यांना सावकाराच्या दारात जाण्याची वेळ येणार नाही .

वन टाईम सेटलमेंट केलेल्या शेतकऱ्यांना परत पिक कर्ज पुरवठा करावा, दिलेले टार्गेट वेळेत पुर्ण करावे अशा बैठकीत खासदार निंबाळकर यांनी सुचना अधिकाऱ्यांना दिल्या.

प्रत्येक बँकेस नोडल ऑफिसर नेमण्यात यावा. बँकेतील कमी असलेल्या कर्मचारी संदर्भात पत्रव्यवहार करावा, यासंदर्भात अपण पाठपुरावा करू असे आश्वासन खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दिले.

याबैठकीस महिला आघाडी जिल्हाप्रमुख शामल वडणे, माजी उपजिल्हाप्रमुख शाम पवार, तालुकाप्रमुख जगन्नाथ  गवळी, शहरप्रमुख सुधिर कदम, अल्प संख्याक जिल्हाध्यक्ष अमीर शेख, उपतालुकप्रमुख सुनिल जाधव, संजय भोसले, रोहित चव्हाण, उपशहरप्रमुख बापूसाहेब नाईकवाडी, दिनेश रसाळ, मीडिया प्रमुख चेतन बंडगर, युवासेना शहरप्रमुख सागर इंगळे, सिंदफळ विभागप्रमुख बालाजी पांचाळ, विद्यार्थी सेना उपजिल्हाप्रमुख विकास भोसले, भिवाजी सावंत, शंकर गव्हाणे तसेच सर्व राष्ट्रीयकृत बॅंकांचे व्यवस्थापक, बँक प्रतिनिधी उपस्थित होते.
 
Top