वागदरी , दि. १

वागदरी ता.तुळजापूर येथील मुळ रहिवासी असलेले व अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाणे येथे  पोलीस हवालदार म्हणून कार्यरत असलेले संदिपान गोपीचंद वाघमारे यांचा सेवा निवृत्ती बद्दल  अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात सत्कार करुन निरोप देण्यात आला.


 संदिपान वाघमारे हे पोलीस दलात तब्बल ३२ वर्षे  सेवा करून अक्कलकोट दिक्षिण पोलीस ठाणे येथून पोलीस हवालदार म्हणून सेवानिवृत्त  झाल्याबद्दल येथील पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या हस्ते सर्व पोलीस कर्मचारी यांच्या वतीने येथोचित सपत्निक सत्कार करण्यात आला.


यावेळी साहाय्य पोलीस निरीक्षक तुकाराम राठोड ,रिपाइंचे (आठवले ) उस्मानाबाद जिल्हा सचिव  एस.के.गायकवाड, पत्रकार किशोर धुमाळ,मल्लिकार्जुन भनगे,गोकुळ बनसोडे, रमेश वाघमारे सह सर्व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
 
Top