तुळजापूर दि १
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान संचलित श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयातील अनुवैजिक व दूरसंचार विभागाचे चतुर्थ श्रेणी कर्मचारी लक्ष्मणराव भोजने यांचा वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने व्यवस्थापक तहसीलदार योगिता कोल्हे यांच्या हस्ते सत्कार करून निरोप समारोप देण्यात आला.
यावेळी प्राचार्य डॉ.एन.डी.पेरगाड, उपप्राचार्य प्रा.रवी मुदकना, प्रबंधिका सुजाता कोळी, विभाग प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते. भोजने यांनी महाविद्यालयात ३६ वर्ष सेवा केली व दि. ३० जुनरोजी वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले