तुळजापूर दि १ 

कोरोना आपत्तीच्या काळात वैद्यकीय क्षेत्रात सेवा करणाऱ्या डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांचा नवनिर्मिती सामाजिक संस्था आणि प्रेरणा सामाजिक संस्थेच्या वतीने डॉक्टर डे च्या निमित्ताने सत्कार करण्यात आला.


तुळजापूर येथे नवनिर्मिती व प्रेरणा सामाजिक संस्था महिला मंडळ यांच्या वतीने जागतिक डॉक्टर डे दिनानिमित्त तुळजापूर उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक डॉ. बोडके,  डॉ. नायकल एस डी,  डॉ.  जाधव एस. ए.,  डॉ. कुतवळ डी.पी , डॉ. बिरादार आर .बी, डॉ.  गडेकर पी आर , डॉ. बर्वे व्ही व्ही, डॉ राणी बिराजदार  सत्कार भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारणी सदस्य मीनाताई सोमाजी, भाजपाचे जिल्हा चिटणीस गुलचंद व्यवहारे  यांच्या हस्ते करण्यात आला

यावेळी भाजपाचे सोशल मीडिया प्रमुख सागर कदम, युवा नेते  सागर पारडे, सौ. अपर्णा बर्दापूरकर, सौ.शिवाणी कदम उपस्थित होते.
यावेळी संस्थेच्या संस्थापिका मिना सोमाजी यांनी तुळजापूर येथील ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी  कोरोनाच्या काळात केलेल्या रुग्ण सेवेबद्दल समाजाच्या वतीने उपस्थित डॉक्टरांचे ऋण व्यक्त केले, समाजाला आपल्या कार्याची कायम आठवण राहील अशा शब्दात डॉक्टर डे च्या निमित्ताने वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांचे आभार मानले.
 
Top