तुळजापूर दि .१ डॉ. सतीश महामुनी
कोरोना संसर्गाच्या आपत्तीमध्ये आयुर्वेद उपचार पद्धती लोकांच्या मदतीला धावून आली , सर्वञ आयुर्वेदाच्या मदतीने कोरोना उपचार लोकांनी स्वयंस्फूर्तीने स्वीकारला आणि आपण प्रतिकार शक्ती वाढविली , या आपत्तीच्या काळात तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयांमध्ये केलेली सेवा ही माझ्या वैद्यकीय सेवेतील मोलाचा कार्यकाल ठरला असल्याची प्रतिक्रिया तुळजापूर येथील डॉ. राहुल पाटील यांनी व्यक्त केली.
डॉक्टर्स "डे " च्या निमित्ताने डॉ. राहुल पाटील यांना शुभेच्छा दिल्यानंतर त्यांनी सांगितले की , तुळजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात अत्यंत चांगले काम या काळात केलेले आहे. येथील डॉ. चंचला बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व डॉक्टर आणि पॅरामेडिकल कर्मचारी यांनी या काळात अखंडितपणे काम केले.
शासनाच्या वेळोवेळी मिळणाऱ्या सूचनांचे पालन करीत तुळजापूर लोहारा या दोन तालुक्यातील कोरोना रुग्णांना या काळात उपचार करण्यात आले. या अडचणीच्या काळात श्री श्री रविशंकर गुरुजी यांच्या प्रेरणेने आपण आर्ट ऑफ लिविंग मध्ये अनेक वर्षापासून प्रशिक्षक म्हणून काम केल्याचा देखील या काळात फायदा झाला. या रुग्णांना योगा सारखे धडे देण्यात आले तसेच आयुर्वेदिक काढा आणि इतर औषध उपचार करून रुग्णांची सेवा करण्यात आली. माझ्या सर्व सहकारी आणि वरिष्ठ डॉक्टर व मार्गदर्शक यांच्या काळात सहकार्य मिळाले. त्यामुळे मी माझ्या परीने तुळजापूर तालुक्यातील रुग्णांची सेवा करू शकलो याचे समाधान आहे. असेही पाटील यांनी सांगितले.