तुळजापूर दि १९ : डॉ. सतीश महामुनी
तुळजाभवानी मंदिरात परंपरागत याज्ञवल्क्य उत्सवाला सुरुवात झाली आहे, कोरोना नियमांचे पालन करीत तुळजाभवानी मंदिर संस्थान या उत्सवाला परवानगी दिली आहे.
तुळजाभवानी देवीच्या मंदिरामध्ये याज्ञवल्क्य सुरुवात परंपरागत पद्धतीने झाली आहे. नवमीला या उत्सवाची सुरुवात केली असून पौर्णिमेस हा उत्सव पूर्ण होईल. या दरम्यान उपाध्ये बंडोपंत पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशअंबुलगे, प्रतीक प्रयाग, गिरीश देवलालकर, किरण पाठक यांच्यासह इतर उपाध्ये मंडळी या उत्सवात रुद्र पाठ व संहिता पाठ करीत आहेत. १५० वर्षापासून चालणारा हा धार्मिक उत्सव असून याला विशेष महत्व आहे या उत्सवाच्या निमित्ताने तुळजाभवानी उपाध्य पुजारी मंडळाचे अध्यक्ष अनंत कोंडो व उपाध्यक्ष मकरंद प्रयाग यांनी तुळजापूर वासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.
पारंपरिक या उत्सवाला यजमान म्हणून ब्राह्मण समाजातील उपाध्ये व त्यांची पत्नी यांना प्रतिवर्षी मान दिला जातो परंतु कोरोना आपत्तीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने या उत्सवावर निर्बंध लागू करून उत्सव साजरा करण्याचे परवानगी दिली आहे त्यानुसार उत्सवाला सुरुवात झाली आहे.