नळदुर्ग ,दि . १९ : एस.के.गायकवाड
अगामी येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणूका वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढण्याची तयारी करणार असून या बाबत शेवटी पक्ष श्रेष्ठीचा निर्णय अंतिम राहील असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडी महिला विभागाच्या उस्मानाबाद जिल्हा अध्यक्षा अँड. जिनत प्रधान यांनी नळदुर्ग येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधताना केले.
वंचित बहुजन आघाडीच्य उस्मानाबाद जि़ल्हा महिला अध्यक्षा अँड. जिनत प्रधान ह्या तुळजापूर, उमरगा तालुका संपर्क दौऱ्यानिमित्ताने त्या नळदुर्ग येथे आल्या असता कार्यकर्त्यांनी त्यांचा सत्कार केला.
यावेळी त्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना बोलत होत्या. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हा अध्यक्ष मारूती बनसोडे,महासचिव बाबासाहेब जानराव, आर. एस. गायकवाड, अँड.निलेश प्रधानसह कार्यकर्ते उपस्थित होते.