उस्मानाबाद , दि .२०
ढोकी पोलीस ठाणे : शेषेराव नामदेव पौळ, रा. वाणेवाडी, ता. उस्मानाबाद हे दि. 19 जुलै रोजी 12.00 वा. सु. वाणेवाडी येथील आपल्या शेतातील सामाईक बांधावरुन जात होते. यावेळी सामाईक बांधावरुन रहदारीच्या कारणावरुन भाऊबंद- सुभाष पौळ, रामेश्र पौळ, मंगल पौळ अशा तीघांनी शेषेराव पौळ यांना शिवीगाळ करुन काठीने मारहान केली व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या शेषेराव पौळ यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
तामलवाडी पोलीस ठाणे : किरण गहिनीनाथ शिंदे, रा. पांगरधरवाडी, ता. तुळजापूर हे दि. 18 जुलै रोजी आपल्या घरासमोर असतांना गावकरी- रधुनाथ शिंदे, अक्षय शिंदे, नाना गाटे, युवराज चव्हाण, सचिन चव्हाण, महेश मते यांसह राळेरास, ता. बार्शी येथील प्रदिप निचळ, शंकर निचळ अशा आठ जणांनी बेकायदेशीर जमाव जमवून शेतजमीन वाटनीच्या कारणावरुन किरण शिंदे यांना शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली. तसेच काठी, पाईपने मारहान करुन जखमी केले. अशा मजकुराच्या किरण शिंदे यांनी दि. 19 जुलै रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 143, 147, 148, 149, 324, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.