लोहारा ,दि . २२
लोहारा येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून 'मिशन ऑक्सिजन' वृक्षारोपणाचे उपक्रम राबविण्यात येत आहे. याच अनुषंगाने लोहारा शहरात 251 वृक्षाचे वृक्षारोपण गुरुवार (दि . 22 ) रोजी भाजपा जिल्हा चिटणीस विक्रांत संगशेट्टी, नगरसेवक आयूब शेख, वि का सोसायटी चेअरमन प्रशांत लांडगे यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा करण्यात आला.
यावेळी माजी तालुका अध्यक्ष प्रमोद पोतदार , सोसायटीचे चेअरमन प्रशांत लांडगे, कमलाकर सिरसाठ, ओबीसी मोर्चा जिल्हा चिटणीस विजय महानुर , नगरसेवक आयूब शेख यांची प्रमुख उपस्थिती होती .
अलीकडच्या काळात निसर्ग चक्र बदलत चालला आहे. वातावरण हवामान पर्यावरण बदलावर परिणाम होत असून कोरोनासारख्या महामारीत ऑक्सिजनसाठी धावपळ सुरू होती. लोहारा शहरात भाजपाच्या वतीने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या 51 व्या वाढदिवसानिमित्त 251 वृक्षाचे वृक्षारोपण करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.
यावेळी लक्ष्मण भोरे, राजशेखर गणेश स्वामी , मल्लीनाथ फावडे , संतोष कुंभार , दयानंद शेवाळे, दिनेश माळवदकर , तुकाराम विरोधे महात्मा रेणके आदीची उपस्थिती होती.