तुळजापूर दि २३ :


नागरिकांचे मूलभूत हक्क , मानवी हक्कांची जपणूक आणि लोकशाहीमध्ये लोकशाही मूल्यांचे रक्षण करण्यासाठी कार्यरत असणाऱ्या मानव संसाधन विकास संस्था महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या उस्मानाबाद जिल्हा अध्यक्षपदी तुळजापूर येथील दत्ता वाळके यांची निवड करण्यात आली आहे.


मानव संसाधन विकास संस्थेच्या उस्मानाबाद जिल्हाध्यक्षपदी  दत्ता हरिबा वाळके यांची नियुक्ती संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड.अनिल  म्हाळसकर यांनी निवडीचे पत्र  देऊन केली आहे. 
या निवडीनंतर जनसंपर्क अधिकारी भीमराव सुतार,  सोलापूर जिल्हा अध्यक्ष मानव विकास संस्था तेजस राऊत यांनी उस्मानाबाद नुतन अध्यक्ष दत्ता वाळके यांचे अभिनंदन केले.
 
Top