उस्मानाबाद, दि. 23
जिल्हयातील सर्व न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालत दि.01 ऑगस्ट 2021 रोजी भरविण्यात येत आहे.
यामध्ये भु-संपादन प्रकरणे, मोटार अपघात तथा कामगार नुकसान भरपाई प्रकरणे सर्व प्रकारचे दिवाणी प्रकरण, तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे, कलम 138 एन.आय.ॲक्ट प्रमाणे असलेली प्रकरणे,वादपूर्व प्रकरणे सामोपचाराने आणि तडजोडी मिटविण्याकरिता ठेवण्यात येणार आहेत, संबंधित पक्षकारांनी याचा लाभ घ्यावा आणि त्यांची प्रलंबित असलेली प्रकरणे सामोपचाराने आणि तडजोडीने मिटवून घ्यावेत,असे आवाहन सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांनी केले आहे.