उस्मानाबाद, दि. 23
राज्याचे पर्यावरण व वातावरणीय बदल,पाणी पुरवठा व स्वच्छता,सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), रोजगार हमी, भूक्ंप पुनर्वसन आणि संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे हे उद्या दि.24 जुलै 2021 रोजी जिल्हयातील कळंब तालुक्याच्या दौऱ्यावर येत आहेत.
त्यांच्या दौऱ्यातील कार्यक्रम असे: सकाळी 9.00 वाजता लातूर येथून मोटारीने कसबे- तडवळेकडे प्रयाण.सकाळी 10.00 वाजा कसबेतडवळे येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक उभारणी संदर्भात भेट व चर्चा,सकाळी 11.00 वाजता एस.पी शुगर कसबे-तडवळे येथे भेट आणि रोलर पुजन, राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यास उपस्थिती. दुपारी 12.00 वाजता कळंबकडे प्रयाण.दुपारी 12.45 वाजता कळंब येथील हॉटेल शालीमार शेजारी, परळी रोड येथे राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन समारंभास उपस्थिती.कळंब येथे जिल्हा विकास निधी अंतर्गत पाच विकास कामांचे भूमीपूजन समारंभ, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयास अभिवादन, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयास अभिवादन. नगर परिषदेने बनवलेल्या ज्येष्ठ नागरिक विरंगुळा गृहाच्या लोकार्पण सोहळयास उपस्थिती.
दुपारी 1.30 वाजता कळंब नगर पालिकेतर्फे उभारण्या येणाऱ्या मल्टीपर्पज हॉल (नाटयगृह/मंगल कार्यालय)भूमीपूजन व विविध विकास कामांचा शुभारंभ. दुपारी 3.00 वाजता हॉटेल प्रेरणा येथे राखीव.दुपारी 3.30 वाजता तालुका स्तरीय अधिकाऱ्यांच्या समवेत बैठक (स्थळ:- पंचायत समिती सभागृह,कळंब), दुपारी 4.30 वाजता कळंब तालुक्यातील मलकापूरकडे प्रयाण.सायंकाळी 5.00 वाजता मलकापूर येथील श्री क्षेत्र दत्त मंदीर संस्थान राष्ट्रीय संत ह.भ.प.एकनाथ महाराज लोमटे यांच्याकडे राखीव.आणि त्यानंतर सोयीनुसार लातूरकडे प्रयाण.