नळदुर्ग, दि . २३
तुळजापूर तालुक्यातील आलियाबाद येथे अरोग्य स्वराज्य प्रकल्प अंतर्गत हॅलो मेडिकलच्या वतीने कोरोना दक्षता समितीसाठी प्रशिक्षण देण्यात आले.
सध्या कोरोना रूग्णांची संख्या कमी झाली असली तरी कोरोना मुक्त गाव करण्यासाठी या प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. यामध्ये कोरोना आजारा विषयी माहिती देण्यात आली, तसेच, मास्क वापरणे, सॅनिटायझरचा वापर करणे, सोशल अंतर ठेवणे, तसेच समितीचे कार्य, जबाबदारी, भुमिका या विषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.व लसीकरणासाठी आवाहन करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण, सरपंच ज्योतीका चव्हाण,ग्रामपंचायत सदस्या रेखा चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य विलास राठोड, रामचंद्र पवार, पोलीस पाटील शिवाजी चव्हाण, हरीचंद्र जाधव ,महिला बचत गटाच्या राजश्री चव्हाण, निर्मला राठोड, हॅलो मेडिकलच्या समुपदेशक नागिणी सुरवसे,फिल्ड सुपरवायझर अनुराधा जाधव, प्रेरिका रिना चव्हाण, रेशमा चव्हाण उपस्थित होते.