उस्मानाबाद , दि . २३
भारताच्या स्वतंत्र लढ्यात "स्वराज्य" हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. आणि तो "मी" मिळवणारच अशी सिंहगर्जना करणाऱ्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची उस्मानाबाद जिल्हा परिषदेत जयंती साजरी करण्यात आली.
जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृह मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला आणि प्रतिमेस अभिवादन केले.
यावेळी ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन दाताळ, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. एन.बी. आघाव,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.हनुमंत वडगावे,जिल्हा कृषी अधिकारी पठाडे,बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता शेगर,बांधकाम विभागाचे शाखा अभियंता ओ.के.सय्यद यांच्यासह ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे सहाय्यक प्रशासन अधिकारी ऋषिकेश पिंपळे यांची यावेळी उपस्थिती होती.