तुळजापूर दि ६ : 

तुळजापूर येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यपदाचा पदभार डॉ. अनिल शित्रे यांनी बालाघाट शिक्षण संस्थेचे सचिव उल्हासदादा बोरगावकर यांच्या हस्ते स्वीकारला.

यशवंतराव चव्हाण वरिष्ठ महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विषयातील प्राध्यापक डॉ. अनिल शित्रे यांची प्रभारी प्राचार्यपदी नियुक्ती करण्यात आली, प्रभारी कार्यालय अधीक्षक पांडुरंग नागरे यांची नियमित कार्यालय अधीक्षक व हनुमंत भुजबळ यांनी वरिष्ठ लिपिक म्हणून पदोन्नती झाल्याबद्दल बालाघाट शिक्षण संस्थेचे सचिव उल्हासदादा बोरगावकर यांच्या हस्ते यानिमित्ताने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. नरसिंग जाधव, कनिष्ठ विभाग उपप्राचार्य प्रा. रमेश नन्नवरे यांची उपस्थिती होती. या निमित्ताने महाविद्यालयातील वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
 
Top