तुळजापूर दि ७ :

राज्य शासनाने केलेल्या सूचनांनुसार तुळजापूर नगरपरिषदेने आणि उपजिल्हा रुग्णालय आणि तुळजापुरात जनजागृती करून केलेले लसीकरण अत्यंत प्रभावी ठरले आहे असे उदगार नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी काढले, लसीकरण करणाऱ्या टीम मधील आरोग्य कर्मचाऱ्यांना नगराध्यक्षांनी विशेष धन्यवाद दिले.


नगरपरिषद तुळजापूर व उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने तुळजापूर येथील प्रभाग क्रमांक १० मधील मंठाळकर मंगल कार्यालयातील स्मार्ट लसीकरण शिबिराच्या उद्घाटन नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी नगरसेवक अमर मगर, नगरसेविका अश्विनी रोचकरी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंचला बोडके, वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीधर जाधव रुग्ण कल्याण समितीचे सदस्य आनंद कंदले, मुख्याधिकारी आशिष लोकरे, संयोजक विशाल रोचकरी,  सेवानिवृत्त बँक कर्मचारी बाळासाहेब हंगरगेकर या मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.

 यावेळी पत्रकार गुरुनाथ बडुरे, शत्रुघन पवार, अनिल आगलावे , उपजिल्हा रुग्णालय येथील डॉ. दिगंबर कमठाणे, नवनाथ खंडागळे, अधिपरिचारिका सुलक्षणा मोरे, डॉ.हेडगेवार रक्तपेढीचे संचालक महेंद्र कावरे , सौ.अश्विनी शिंदे, सौ.वैशाली धरणे, सौ.शारदा बडूरे, राजेश शिंदे, दिलीप मगर, सदानंद राव, धर्मेंद्र कावरे , श्रीशैल्य पाटील, देविदास धट, विशाल गंगणे, नितीन जाधव, श्रीनाथ शिंदे, वैभवकुमार अंधारे, गणेश रोचकरी, महेंद्र पाटील, नागेश काळे, जयजयराम माने , मुख्याध्यापक बाळासाहेब जेटीथोर, सुरजमल शेटे सुभाष राठोड उपस्थित होते.


याच कार्यक्रमामध्ये तुळजापूर शहरातील सेवानिवृत्त बँक कर्मचारी नंदकुमार कुतवळ, बाळासाहेब हंगरगेकर,  अरविंद ठोंबरे, संजय कांबळे, राजेंद्र घाडगे , डॉ. आनंद मुळे ,  उपजिल्हा रुग्णालयातील लसीकरण टीम या सर्वांचा सत्कार संयोजक विशाल रोचकरी यांच्या वतीने तुळजाभवानी ची प्रतिमा देऊन करण्यात आला.

 सदरील शिबिरात विक्रमी ३५१ नागरिकांना लसीकरण करण्यात आले.  प्रास्ताविक भाषणात संयोजक विशाल रोचकरी यांनी केले.
यावेळी मुख्याधिकारी आशिष लोकरे, नगरसेवक अमर मगर मार्गदर्शन केले.
नगर परिषद कार्यालयाच्या वतीने १८ जून ते २६ जून या कालावधीमध्ये ९७१ जणांचे, १ जुलै ते १७ जुलै या कालावधीत ९५१ जणांचे एकूण १९२२ नागरिकांना शिबिराच्या माध्यमातून लस देण्यात आली आहे. अशी माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी याप्रसंगी जाहीर केली.
 
Top