उस्मानाबाद , दि. ५
पोलीस ठाणे उमरगा : पाणी फिल्टरचा धंदा का चालु देत नाही तु पाण्याचा भाव कमी केल्यांने धिरजचा पाणी फिल्टरचा व्यवसाय चालत नाही. या कारणा वरुन 1) महेश चव्हाण,2) विष्णु चव्हाण, 3) अनंत चव्हाण सर्व रा.जगदाळवाडी यांनी आकाश संजय भगत रा.जगदाळवाडी यांना शिवीगाळ व लाथाबुक्यांनी मारहाण केली व काठीने मारुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. दिनांक 04 जुलै रोजी आदर्श वाघमोडे यांनी दिले प्रथम खबरे वरुन भादसं 324,323, 504,506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
पोलीस ठाणे ढोकी : मंगल रमेश कांबळे, रा. पळसप यांना मागील भांडणाची कुरापत काढुन तक्रारी करुन 1) कुमार नागनाथ गायकवाड, 2) प्रमोद नवनाथ गायकवाड, दोघे रा.लातुर 3) चंद्रशेन सुधान कांबळे यांनी काठीने मारहाण केली.मंगल यांना मारताना सोडवण्यास आलेले मुलगा-संजय, मुलगी- नेहा व प्रिया यांना पण काठीने मारहाण केली. मंगल कांबळे यांनी दिले प्रथम खबरे वरुन भादसं 324, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे