उस्मानाबाद , दि .२१

उस्मानाबाद जिल्हा: परंडा पो.ठा. 25 / 2018 या दरोड्याच्या गुन्ह्यासह परंडा 121 / 2021 या मारहानीच्या तसेच आनंदनगर पो.ठा. 154 / 2021 या चोरीच्या गुन्ह्यात कांतीलाल दत्तु पवार, रा. सावधरवाडी, ता. परंडा हे पोलीसांना पाहिजे (Wanted) होते. ते मुळ गावी आल्याची खबर मिळताच आंबी पो.ठा. च्या पथकाने त्यांना आज दि. 21 जुलै रोजी अटक करुन परंडा पो.ठा. च्या ताब्यात दिले आहे. तर येरमाळा पो.ठा. 37 / 2020 या चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी- सतिश राजाभाउ नाकाते, रा. कळंब हा स्था.गु.शा. च्या पथकास आज ईद बंदोबस्त गस्ती दरम्यान कळंब येथे आढळल्याने त्यास अटक करुन येरमाळा पो.ठा. च्या ताब्यात दिले आहे.

 
Top