उस्मानाबाद , दि . २१
आनंदनगर पोलीस ठाणे: अवैध मद्य विरोधी कारवायांदरम्यान पोलीस दलाने जप्त केलेले अवैध श्रमद्य व मद्य उत्पादन साहित्य पोलीस ठाण्याच्या मुद्देमाल कक्षात ठेवले असल्याने मुद्देमाल कक्षास गुदामाचे व बकाल स्वरुप येते. नुकताच न्यायालयाच्या आदेशाने आनंदनगर पोलीस ठाण्याने 15 गुन्ह्यांतील अवैध मद्य साठा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या देखरेखीत नष्ट केला.