जलकोट,दि.२१ : मेघराज किलजे 

तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील पार्वती कन्या प्रशालेची विद्यार्थिनी कु. राजलक्ष्मी किलजे हिने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा(इ.१०वी) मध्ये ९८.६० टक्के  गुण मिळवून  यश संपादन केल्याबद्दल अणदूर येथील जवाहर महाविद्यालयाचे प्राध्यापक सत्येंद्र राऊत यांनी राजलक्ष्मी किलजे या विद्यार्थिनीचा सत्कार केला.


यावेळी  निवृत्त पोलीस अधिकारी रेवाप्पा राठोड,  निवृत्त महावितरणचे कर्मचारी महादेव मडोळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष विकास चव्हाण, तुकाराम कुंभार आदीजण उपस्थित होते.
 
Top