नळदुर्ग , दि. 21

मुबंई - हैद्राबाद  जाणारी मेट्रो ट्रेन सोलापूर, नळदुर्ग, उमरगा, बसवकल्याण मार्गे हैद्राबाद या मार्गाने जाण्यासाठी मंजुरी देण्याची मागणी शिवसेनेचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्याकडे निवेदनाव्दारे दि. 20 जुलै रोजी करण्यात आली आहे. 


केंद्र शासनाने मुंबई हैद्राबादकडे जाण्यासाठी मेट्रो ट्रेन मंजुर केली असुन ही मेट्रो ट्रेन मुंबई,  बारामती, पंढरपूर, सोलापूर, अक्कलकोट मार्गे जाण्यासाठी भूसंपादन करण्याकरीता सर्व्हे सुरु झाला आहे. दरम्यान यापूर्वीच हैद्राबादला जाणारी रेल्वे ही अक्कलकोट मार्गे जात आहे. त्यामुळे आत पुन्हा त्या मार्गे मेट्रो ट्रेन घेऊन जाऊन मराठवाड्यावर अन्याय होत आहे, कारण ही ट्रेन सोलापूर ते नळदुर्ग, उमरगा, बसवकल्याण मार्गे हैद्राबादला गेली तर तुळजापूर, अक्कलकोट या तीर्थ क्षेत्राला जाणारे नळदुर्ग हे मध्यवर्ती ठिकाण आहे. त्याचबरोबर नळदुर्गचा  ऐतिहासिक किल्ला, प्रभु रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेले रामतीर्थ देवस्थान हे ही पर्यटकांसाठी व भाविकांसाठी सोयींचे होणार आहे. नळदुर्गपासुन 30 किलोमिटरवर तुळजापूर ,अक्कलकोट हे दोन्ही तिर्थ क्षेत्र आहेत. तर नळदुर्गचा ऐतिहासिक किल्ला, श्री खंडोबा देवस्थान व श्री रामतीर्थ देवस्थान यांच्यासह पाच तिर्थ क्षेत्र या मेट्रो ट्रेन ने जोडला  जाईल. 

त्यामुळे मुंबई हैद्राबाद ही मेट्रो ट्रेन नळदुर्ग, उमरगा मार्गे गेली तर याचा मराठवाड्याला ही फायदा होणार आहे. त्याच बरोबर दोन्ही तीर्थ क्षेत्राबरोबर पर्यटन स्थळाची ही सोय होणार आहे, त्यामुळे या माध्यमातुन पर्यटक आणि भाविकांची सोय होणार आहे. म्हणून मुंबई हैद्राबाद जाणारी मेट्रो ट्रेन ही नळदुर्ग मार्गे जाण्यासाठी आपण आपल्या पातळीवरुन प्रयत्न करुन या ट्रेनसाठी नळदुर्ग कसे सोयीचे होणार आहे. हे ही केंद्रशासनाला आपल्या माध्यमातून पटवून देण्यासाठी हे निवेदन दिल्याचे म्हटले आहे.
 सध्या ह्या मेट्रो ट्रेनच्या भूसंपादनाचे काम सोलापूर पर्यंत झाले आहे. पुढे ते आक्कलकोट तालुक्यात होणार आहे. तत्पूर्वी आपण हे भूसंपादनाचे काम थांबवून ते नळदुर्ग, उमरगा ते पुढे बसवकल्याण मार्गे जाण्यासाठी आपण केंद्र शासन व केंद्रीय रेल्वे मंत्री यांच्या समोर ही मागणी मांडावी ही विनंती असुन मुंबई हैद्राबाद जाणारी मेट्रो ट्रेन सोलापूर ते नळदुर्ग, उमरगा बसवकल्याण मार्ग जाण्यासाठी मंजुरी मिळावी असे नमुद केले आहे. 


या निवेदनावर युवा सेनेचे माजी तालुका प्रमुख ज्ञानेश्वर नारायण घोडके, नळदुर्ग शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे, पत्रकार सदस्य विलास येडगे, तानाजी जाधव, उत्तम बणजगोळे, शिवाजी नाईक, सामाजिक कार्यकर्ते संजय जाधव, माजी नगरसेवक सुधिरसिंग हजारे, वृक्ष मित्र अमर भाळे आदी जणांच्या सह्या आहेत.
 
Top