ताज्या घडामोडी


काटी ,दि .२१

 तुळजापूर तालुक्यातील काटी येथील दिलीप (नेमाजी) चंद्रहरी शिंदे वय (46) यांचे सोलापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारा दरम्यान  निधन झाले. 

मागील महिन्याभरापासून त्यांच्यावर सोलापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. परंतु आज सायंकाळी साडेपाच वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. ते तुळजापूर येथील श्री कुलस्वामिनी विद्यालयात शिपाई या पदावर कार्यरत होते.
 त्यांच्या अकाली जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, सुन, एक भाऊ, बहिण, भावजय असा परिवार आहे.
 
Top