तुळजापूर दि .२१ :
भारतीय जनता पार्टीच्या केंद्रातील सरकारच्या माध्यमातून प्रधानमंत्री जल जीवन मिशन या योजनेमध्ये तुळजापूर तालुक्यातील गुळहळ्ळी या गावाचा समावेश होत असून त्यासाठी तज्ञ समितीकडून गावाचे सर्वेक्षण करण्यात आले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रधानमंत्री जलजीवन मिशन या योजने अंतर्गत तुळजापूर तालुक्यात मौजे-गुळहळ्ळी सर्वेक्षण करण्यात आले या योजने अंतर्गत गावातील प्रत्येक कुटुंबांना नळ जोडणी कनेक्शन मिळणार आहे व घरातील प्रत्येकाला ५५ लिटर शुद्ध पाणी टाकीद्वारे मिळणार आहे, या योजनेमुळे गावातील नळ नसलेल्या वंचित कुटुंबाना नळाद्वारे शुद्ध पाणी या योजनेमधून देण्यात येणार आहे.
यासंदर्भात भाजपाचे सचिन घोडके यांनी सांगितले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ग्रामीण भागाच्या विकासासाठी खूप महत्त्वाच्या योजना दिलेले आहेत. त्यामधील जल जीवन मिशन ही योजना या गावासाठी मिळावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असे सांगितले.