लोहारा , दि . १७ :
कोरोनाच्या संकटकाळात सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये , तसेच कोव्हिड 19 च्या नियमांचे काटेकोरपणे पालन करीत मुस्लिम समाजाने पवित्र सण इदुल जुहा बकरी ईद सणानिमित्त नमाज घरीच अदा करावे व पोलीस प्रशासनास सहकार्य करावे असे आव्हान लोहारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धरमसिह चव्हाण यांनी केले आहे.
दि. 21 जुलै रोजी इदुल झुहा बकरीद ईद निमित्त लोहारा पोलीस ठाण्यात दि. 16 रोजी मुस्लिम समाजाची बैठक बोलावण्यात आली होती.
या प्रसंगी लोहारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धरम सिंह चव्हाण यांनी सदर मुस्लिम समाजाच्या बोलावण्यात आलेल्या बैठकीमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम समाजाने ईद निमित्त होणारी नमाज घरीच अदा करावे व पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आव्हान केले . याप्रसंगी मुस्लिम समाजाच्या वतीने देखील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ईद निमित्त नमाज घरीच करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी लोहारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धरम सिंह चव्हाण, एस. एस. पांचाळ, तर मुस्लिम समाजाचे आमीन सुंबेकर,पत्रकार अब्बास शेख, शब्बीर गवंडी, माजी नगरसेवक आरिफ खानापुरे, आयुब अब्दुल शेख,सलीम भाई शेख, निहाल मुजावर, हाजी बाबा शेख, हैदर शेख, इस्माईल मुल्ला,आमीन कुरेशी, सलीम कुरेशी, रियाज खडीवाले,आदीसह मुस्लिम बांधव उपस्थित होते.