तुळजापूर दि ८ :
शिक्षण खात्याच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना बँकेमध्ये खाते उघडणे ज्या सूचना देण्यात येत आहेत. या निर्णया संदर्भात तुळजापूर तालुका जनहित संघटनेच्या वतीने गटशिक्षण कार्यालयाकडे निवेदनाद्वारे सर्व विद्यार्थ्यांची झिरो बॅलन्स खाते उघडण्याची मागणी करण्यात आली आहे.
जनहित संघटनेच्या वतीने गटशिक्षणाधिकारी तुळजापूर यांना देण्यात आलेल्या निवेदनामध्ये असे म्हटले आहे की, कोरोना आपत्कालीन परिस्थिती असल्यामुळे विद्यार्थ्यांना पैसे भरून बँकेमध्ये खाते उघडणे कठीण आहे, त्यामुळे शून्य रुपये धोरणाचे बँक खाते उघडण्याची परवानगी विद्यार्थ्यांना देण्यात यावी आणि तशा सूचना बँकांना देण्यात यावेत. तसेच हे शक्य नसेल तर विद्यार्थ्यांच्या पालकांच्या बँक खात्यावर शालेय खात्याने व्यवहार करावा अशी मागणी या निवेदनात केली आहे.
जनहित संघटनेचे अध्यक्ष अजय साळुंखे, प्रशांत कदम, संतोष भोरे, विशाल साळुंखे , नितीन कांबळे, मोहन जाधव, बजरंग शिरसागर, राजू भोसले यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.