उस्मानाबाद , दि ३

पोलीस ठाणे येरमाळा:  तुकाराम शिंदे रा.पानगाव, ता.कळंब हे दिनांक 29 जुन रोजी 17.00 वा आपल्या शेतात होते.भाउबंद इंदुबाई, फुलबाई, रामेश्वर,शिवाजी, माणीक  यांनी शेतीच्या वादातुन तुकाराम यांना शिवीगाळ करुन लाथा बुक्यांनी,काठीने मारहाण करुन ठार मारण्याची धमकी दिली. वरुन भादसं कलम 143, 148,149,323, 504,506  अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

पोलीस ठाणे परंडा : बाबुराव गोफने,रा.भोत्रा हे दिनांक 01 जुलै रोजी 20.30 वा आपल्या शेताजवळील रस्त्यावर होते. यावेळी गावकरी अजित व किशोर पवार यांनी बाबुराव यांना शिवीगाळ करुन लाथा बुक्यांनी, मारहाण करुन ठार मारण्याची धमकी दिली. वरुन भादसं कलम 324, 504,506,34  अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

पोलीस ठाणे शिराढोण : बिभीषण गायके, रा. मंगरुळ हे दिनांक 02 जुलै रोजी 08.30 वा घरासमोर असतांना गावकरी पाडळे कुटुंबीय राजेंद्र, शिरु, साखराबाई, सारीका यांनी नांगर ढकलण्याच्या वादातुन बिभीषण  

यांना शिवीगाळ करुन लाथा बुक्यांनी, मारहाण करुन ठार मारण्याची धमकी दिली. बिभीषण यांच्या बचावास त्यांची पत्नीसह मुलगा-अविनाश हे सरसावले असता पाडळे कुटुंबीयांनी  त्यांनाही मारहाण केली. यावरुन भादसं कलम 324, 504,506,34  अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
Top