उमरगा , दि .१२ 

उमरगा तालुका व परिसरातील शेतकऱ्यांसाठी खरीप पिके व फळबाग लागवड या विषयावर बुधवारी  दि.१४  रोजी  सकाळी ११  वाजता 'शेतकरी - शास्त्रज्ञ् परिसंवादाचे' उमरगा चौरस्ता येथील ओम लॉन्स येथे आयोजन करण्यात आले आहे.


या कार्यक्रमासाठी कृषी विज्ञान केंद्र तुळजापूर येथील कार्यक्रम समन्वयक डॉ. सचिन सूर्यवंशी, कीड रोग तज्ञ डॉ. श्रीकृष्ण झगडे, फळबाग तज्ञ डॉ. गणेश मंडलिक, मृद शास्त्रज्ञ डॉ. भगवान अरबाड, माजी विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. विठ्ठलराव जाधव, शांतिदूत परिवाराच्या संस्थापक अध्यक्षा सौ. विद्याताई जाधव, तालुका कृषी अधिकारी सुनील जाधव व तालुक्यातील प्रगतशील शेतकरी यांचे मार्गदर्शन लाभणार आहे, तरी उमरगा तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवानी उपस्थित राहून लाभ घ्यावा. असे आवाहन कार्यक्रमाचे संयोजक तालुका कृषी विभाग व  शेतकरी शांतिदूत परिवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.

 
Top