परंडा दि .११ :
परंडा शहरासह परिसराला शुक्रवार शनिवारी मध्यरात्री पावसाने झोडपुन काढले ढगफुटीमुळे शहरातील अनेक घरांमध्ये पाणी साचले दोन दिवसात ११५ मिली लिटर पाऊस झाला आहे . या पावसामुळे शहरालगत आयुबखाँ महेबुबखाँ पठाण यांच्या उडिदाचा पिकात पाणी साचल्याने पीक वाया गेल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
शुक्रवार शनिवारी मध्यरात्री मुसळधार पावसाने झोडपले या पावसाचे पाणी घरावरील पत्र्याच्या पनाळ्यात पाणी बसत नसल्याने पाणी घरात येत होते . त्यामुळे अनेकांनी रात्र जागुन काढली गटारी रस्ते या जोराच्या पाण्यामुळे धुवून गेले सखाल भागात पाणी साचले .
आयुबखाँ पठाण यानी निर्मल उडीदाच्या दोन पिशव्या पेरल्या होत्या पेरता वेळस त्यांनी खत पेरल्याने उडीद जोमात आले होते . बैलाचा कोळपा व खुरपन केल्याने उडीद जोमात आले होते मात्र दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे पिकात पाणी साचल्याने पीक करपुन जाऊ लागले आहे . महसुल विभागाच्या अधिकाऱ्यांनी नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून आर्थीक मदत मिळवुन द्यावी आशी मागणी शेतकऱ्याने केली आहे.