तुळजापूर दि .१२ : डॉ. सतीश महामुनी

तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिरासमोर असणाऱ्या दगडी पायऱ्यामुळे खडकाळ पलीकडे जाणाऱ्या वाहतुकीला खूप मोठा अडथळा निर्माण झाला आहे . यासंदर्भात नगरपरिषदेने जिल्हा नियोजन मंडळाकडे प्रस्ताव देऊन सदरील रस्ता नव्याने निर्माण करण्याची मागणी नगरसेवक सुनील रोचकरी यांनी केली आहे.


तुळजापूर विकास प्राधिकरणाच्या अंतर्गत श्री तुळजाभवानी देवीच्या महाद्वारासमोर दक्षिण उत्तर दिशेने दगडी पायऱ्या काढुन सदर परिसरामध्ये दगडी रस्ता तयार केलेला आहे. मात्र येथे असणाऱ्या पायऱ्यामुळे या परिसरात वावरण्यासाठी खूप मोठा अडथळा निर्माण झाला आहे.  या पायऱ्याच्या परिसरात बांधकामाचे साहित्य आणि वाहने उभी करून जागेचा अपव्यय केला जात आहे.  त्यामुळे नगरसेवक सुनील रोचकरी यांनी नगरपरिषदेच्या बैठकीमध्ये सदर पायऱ्या दूर करून नव्याने रस्ता करण्याची मागणी केली आहे. 


 तेव्हा सदर रस्त्याचे काम तुळजापूर विकास प्राधिकरणाअंतर्गत केलेले असून त्याचा कालावधी पूर्ण झालेला नाही. तांत्रिक अडचणीमुळे सदर रस्ता करण्यासाठी जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत सदर रस्त्याच्या कामाचा प्रस्ताव देण्याची आवश्यकता आहे. नगरपरिषदेला प्रस्ताव तातडीने जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत ठेवण्यासाठी सादर करावा अशी मागणी आपण नगरपरिषदेकडे वारंवार करीत असल्याचे नगरसेवक सुनील रोचकरी यांनी सांगितले आहे.
 
Top