तुळजापूर दि . १२ : 

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनील  गव्हाणे यांच्या वाढदिवसानिमित्त  राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तुळजापूर  यांच्यावतीने यशवंतराव चव्हाण महाविद्यालय तुळजापूर येथे बालाघाट शिक्षण संस्थेचे सचिव उल्हास बोरगावकर यांच्या  हस्ते वृक्षारोपण करण्यात आले 

यावेळी   बोरगावकर , प्राचार्य अनिल शित्रे ,  जिल्हाध्यक्ष दुर्गेश साळुंके, तालुकाध्यक्ष रोहित चव्हाण, समर्थ पैलवान,  जिल्हा सरचिटणीस मयूर दराडे,  शहराध्यक्ष आदित्य शेटे, शहर उपाध्यक्ष विवेक खंदारे, संकेत साळुंके, रणजित पलंगे, कार्तिक पवार, रणजित ऊंबरे, सचिन भोसले व सर्व विद्यार्थी  उपस्थितीत होते. 

बालाघाट शिक्षण संस्थेचे सचिव  बोरगावकर यांचे याप्रसंगी जिल्हाध्यक्ष दुर्गेश साळुंखे यांनी स्वागत केले. त्यानंतर महाविद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. 
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने याप्रसंगी महाविद्यालयाचे प्रशासनाचे आभार मानण्यात आले.
 
Top