तुळजापूर दि . १३
तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिराच्या पाठीमागे असणाऱ्या आराध्यवाडी परिसरात युवकांनी पुढाकार घेऊन कै. शारदाबाई पवार वाचनालयाची सुरुवात केली. विशेष म्हणजे या परिसरातील रहिवाशांना वाचनालयाच्या उपक्रमाची खूप मोठ्या प्रमाणावर गरज होती.
तुळजापूर शहरातील श्री तुळजाभवानी मंदीरापाठीमागे आराधवाडी येथे कै. शारदाबाई पवार सार्वजनिक वाचलयाचे सामाजिक कार्यकर्ते सागर कदम व बालाजी गायकवाड यांच्यावतीने कै. शारदाबाई जनार्धन पवार यांच्या स्मरणार्थ ज्येष्ठ नागरिक विष्णू पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून हणमंत पवार, दत्ता इंगळे यांची याप्रसंगी उपस्थिती होती.
यावेळी आराधवडी मित्र मंडळाचे नागेश पवार, उमेश गायकवाड, सुदर्शन पवार, सोमनाथ पवार,सचिन काळे, नवनाथ इंगळे, प्रशांत पवार, बाळू पवार, सुरज पवार, आकाश पवार, कृष्णा पवार,बाळू कदम, अभिषेक पवार, ज्योतीराम जाधव, शिवा पवार, दिपक कदम, गणेश कदम,अजय, पवार, नितीन भणगे आदी नागरीक उपस्थीत होते.
यानिमित्ताने सामाजिक कार्यकर्ते सागर कदम यांनी या परिसरात राहणारे ज्येष्ठ नागरिक आणि तरुण विद्यार्थी यांना या वाचनालयाचा खूप उपयोग होणार आहे . सर्वांनी जास्तीत जास्त वाचन करून वर्तमानपत्रामध्ये येणाऱ्या विचारांचे ग्रहण करून त्याचा उपयोग रोजचे जीवन जगताना करावा अशी अपेक्षा आम्ही तरुणांनी ठेवली आहे अशी प्रतिक्रिया दिली.