तुळजापूर दि .१३ डॉ. सतीश महामुनी

शिक्षण क्षेत्रामध्ये एखाद्या संस्थेने २५  वर्षे अविरतपणे ज्ञानदानाचे काम करणे कोणत्याही संस्थेसाठी निश्‍चितपणे भूषणावह आणि गौरवास्पद कामगिरी आहे,  उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रतिष्ठित शिक्षण संस्था असणाऱ्या आर्य चाणक्य विद्यालयाच्या वाटचालीस नुकतेच २५  वर्ष पूर्ण झाले. या निमित्ताने शिक्षण संस्थेचे संचालक मंडळ आणि शिक्षक वृंद यांनी अनौपचारिकपणे रौप्य महोत्सव साजरा केला. कोरोना आपत्कालीन परिस्थिती असल्यामुळे या महोत्सवाला मोठ्या कार्यक्रमाचे स्वरूप देता येत नाही.  अविरतपणे पंचवीस वर्ष त्याग आणि तपस्या या उद्दिष्टांना सोबत घेऊन आर्य चाणक्य विद्यालय यांनी उस्मानाबाद येथे प्रदीर्घ काळ उत्तम शिक्षण आणि संस्कार देण्याचे काम केले आहे . मागील पंचवीस वर्षांमध्ये शिक्षण संस्थेने  परिश्रम आणि  अडचणी यांना सामोरे जात आजपर्यंत ही वाटचाल केली आहे . 

संस्था उभारणी मध्ये योगदान देणारे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते  मिलिंद पाटील,  रा स्व संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी शेषाद्री  डांगे, कमलाकर पाटील, प्रशालेचे मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक वृंद या सर्वांना  रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने  सर्व पालक आणि विद्यार्थ्यांच्या वतीने आम्ही हार्दिक शुभेच्छा देत आहोत.



 शिक्षण क्षेत्रामध्ये आर्य चाणक्य विद्यालयाने मागील पंचवीस वर्षांमध्ये प्राथमिक , माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि वरिष्ठ महाविद्यालय अशी चढत्या क्रमाने प्रगती केली आहे. 

भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचा या शिक्षण संस्थेशी खूप जिव्हाळ्याचे संबंध होते. 
या परिसरात त्यांच्या अनेक आठवणी आजही जाग्या आहेत, त्यांच्या पश्चात त्यांच्या कन्या आणि त्यांचे कुटुंबीय आर्य चाणक्याच्या परिवारामध्ये सहभागी आहेत. हे उस्मानाबाद जिल्ह्यासाठी भूषणावह बाब आहे. ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार असे स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संस्थापक परम पूज्य बापूजी साळुंखे यांनी सांगितल्याप्रमाणे आर्य चाणक्य शिक्षण संस्थेने देखील दर्जेदार शिक्षण आणि विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी आवश्यक असणारे संस्कार देण्यासाठी या शिक्षण संस्थेने विशेष प्रयत्न केले आहेत .
 
Top