नळदुर्ग , दि . १३ :
श्री. क्षेत्र मैलारपूर (नळदुर्ग) याठिकाणी खंडोबा मंदिराच्या परिसरात सोमवार दि. १२ जुलै रोजी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती जन्मोत्सव समितीच्या वतीने ५१ वृक्षांची मान्यवरांच्या हस्ते लागवड करण्यात आली.
दिवसेंदिवस पर्यावरणाचे संतुलन बिघडत चालल्याने त्याचा विपरीत परिणाम होऊन मानवी जिवन धोक्यात येत असल्याचे सर्वश्रुत आहे. त्यामुळे वृक्ष लागवड करणे ही काळाची गरज ओळखुन नळदुर्ग येथे वृक्ष लागवड हि चळवळ सुरु करण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणुन खंडोबा मंदिर परिसरात सोमवारी वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी नळदुर्ग पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक कैलास लाहाने , सुधीर मोटे , नगरसेवक विनायक अहंकारी , माजी नगरसेवक सुधीर हजारे, व्यापारी मंडळाचे सुभाष कोरे, नाभिक संघटनेचे राजेंद्र महाबोले, पप्पू पाटील, सामाजिक कार्यकर्ते संजय जाधव, मारुती खारवे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष महेबुब शेख, भाजपचे सुशांत भुमकर, सुजित सुरवसे, भाजयुमोचे श्रमिक पोतदार, जेष्ठ नागरिक आशोक चव्हाण, रघुनाथ नागणे, पञकार शिवाजी नाईक, उत्तम बणजगोळे, नगरपालिकेचे कर्मचारी ,खलील शेख, मुनिर शेख, ज्योती बचाटे, वाल्मिक खारवे, शैलेश बनसोडे, अमित गायकवाड , राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती जन्मोत्सव समितीचे पदाधिकारी पद्माकर घाडके, पत्रकार विलास येडगे, वृक्षमिञ अमर भाळे ,
ज्ञानेश्वर घोडके, महेश घोडके , अशोक घोडके, मारुती घोडके याच्यासह कार्यकर्ते आदिजण उपस्थित होते.
अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती जन्मोत्सव समितीच्या वतीने नळदुर्ग येथे गेल्या तीन वर्षापुर्वीपासुन वृक्षारोपण मोहीम राबविण्यात येत आहे. त्यापैकी शहरातील नगरपरिषद रोडच्या दुतर्फा लावलेले झडामुळे शोभा वाढली आहे. दरम्यान खंडोबा मंदिर परिसरात झाडे लावण्यासाठी दयानंद चौरे यानी मोलाचे सहकार्य केले.