परंडा, दि.२४ :

नुकत्याच जाहीर झालेल्या दहावी शालांत परिक्षेत येथील कल्याणसागर माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी करण प्रकाश काशीद याने ९५.४० टक्के गुण संपादन केल्याबद्दल सरगम हेल्थ क्लब, वृक्ष संवर्धन समिती, शिक्षकांच्यावतीने शनिवार  दि.२४ रोजी  येथील सरगम मंगल कार्यालय येथे गुलाबाचे झाड देवुन गौरव  करण्यात आला.
यावेळी सरगम हेल्थ क्लबचे प्रशिक्षक बाशाभाई शहाबर्फीवाले,वृक्ष संवर्धन समितीचे जि.प.केंद्रप्रमुख बाळासाहेब घोगरे,पाणी फाऊंडेशन पुरस्कार विजेते शिक्षक अमोल अंधारे, जि.प.मुख्याध्यापक आप्पा बल्लाळ, सहशिक्षक गोवर्धन अलबत्ते, सामाजिक कार्यकर्ते मकसुद पल्ला, पञकार प्रमोद वेदपाठक,मनोज परांडकर,युसुफ शहाबर्फीवाले आदि उपस्थित होते.

 
Top