तुळजापूर दि .२४ 

राज्यशासनाच्या कोरोना नियमांचे पालन करीत श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन भाविकांना खुले करण्यात यावे अशी मागणी श्री तुळजाभवानी पुजारी मंडळाचे उपाध्यक्ष विपिन शिंदे पुजारी दादासाहेब खपले आणि इतर पुजारी बांधवांनी केली आहे.

श्री तुळजाभवानी देवी वर भाविकांची खूप मोठी श्रद्धा आहे. दर्शनाच्या निमित्ताने तुळजापूर मध्ये मोठ्या संख्येने भाविक येत असून महाद्वारापासून ते दर्शन घेत आहेत . त्यांच्या या दर्शनामुळे त्यांचे समाधान होत नसल्याचे चित्र असून तातडीने प्रशासनाने देवीचे दर्शन भाविकांना खुले करावे, यासाठी राज्य शासनाच्या सर्व नियमांचे पालन करण्यात यावे असे निवेदनामध्ये नमूद केले आहे . 
सदर निवेदन श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे व्यवस्थापक यांना दिले आहे
 
Top